श्री दिवाकर मोहनींच्या स्त्री-पुरुष संबंधाच्या भ्रामक कल्पना
आजचा सुधारकच्या काही अंकातून दिवाकर मोहनी यांनी स्त्रीपुरुषांमधील स्वातंत्र्याचा विचार मांडताना स्त्रीपुरुषात स्वैर लैंगिक स्वातंत्र्य असावे असे म्हटले आहे. त्याना एकपतीपत्नीव्रताची कल्पना मान्य नाही. बहुपतिक किंवा बहुपत्नीक कुटुंब असल्यास हरकत नाही असे त्याना वाटते. त्यांच्या एकूण विचारावरच लैंगिक स्वातंत्र्य हे सर्वश्रेष्ठ मूल्य असून इतर मूल्ये दुय्यम स्वरुपाची आहेत असे त्यांचे मत असावे असे वाटते. त्यांनीह्या …